Copy Pate Block

Sunday 27 November 2016

टप टप पडती अंगावरती - मंगेश पाडगावकर


टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर तया तालावर गाणे अमुचे जुळे !
कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !
दरू दरू हे सूर वाहती
ऊन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !
गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरिपसारा या गाणयातुन फुले !
फुलांसारखे सव र फुला रे
सुरात मिसळुनी सरू , चला रे
गाणे गाती तचे शहाणे बाकी सारे खुळे !

No comments:

Post a Comment