Copy Pate Block

Sunday 27 November 2016

घननीळ [कवी - विंदा करंदीकर]



घननीळ सागराचा घननाद येतो कानी
घुमती दिशा दिशात लहरीमधील गाणी

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत

आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे
भटकी चुकार होडी लाटात संथ धावे

वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा

जलधीबरोबरीचे आभासमान नाते
त्याची त्यास धरती संकेत फक्त खोटे

सांनिध्य सागराचे आकाश पांघराया
परी साथ ना कोणाची अस्तित्व सावराया 


कवी - विंदा करंदीकर

No comments:

Post a Comment