Sunday 27 November 2016

चालता चालता काय होते



समोर समोर चालता चालता
शेवटी संपून जाईल रस्ता,
आकाश राहील उभे पुढ्यात,
चांदोबाला लागेल हात.
असे काही मनात धरून
चालत सुटलो रस्त्यावरून.
         




गळ्यात गलोल, हातात छडी,
खिशात शेंगदाण्याची पुडी.
चालता चालता काय होते,
रेल्वे फाटक आडवे येते.
गाडीला मग 'टाटा' करतो
समोर समोर चालत राहतो.




चालता चालता काय होते,                          
एक छोटे तळे लागते,
पाय बुडवून, भाकऱ्या खेळून
दाणे खात चालतो फिरून.


पुढे एकदम आले समोर,
चिंचेचे वन हिरवेगार !
गलोल मारून चिंचा पाडतो,
चोखत चोखत दुडका पळतो.


मग पुढे काय झाले,
ओसाड माळ, डोंगर आले.
सगळीकडे सामसूम
कडक ऊन घामाघूम.
बसून राहिलो दगडावर
एकटा एकटा... दूर घर...

'आई आई' ओरडू वाटले,
दाटून दाटून रडायला आले.
खाड खाड बूट वाजले
उंचच उंच कोण आले ?
    


  आरपार घाबरून गेलो,
  अंथरुणात मी उठून बसलो.

7 comments:

  1. Yes on balbharati site maharashtra government

    ReplyDelete
  2. चालता चालता काय होते,
    एक छोटे तळे लागते,
    पाय बुडवून, भाकऱ्या खेळून
    दाणे खात चालतो फिरून.
    मला या ओडी चा अर्थ सांगा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. भाकरी खेलती म्हणजे, पाण्यामध्ये चपटे दगड़ टाकल की त्याचे टप्पे पड़त जताता. हया खेलाला bhakaryaa खेलने म्हन तात . Haven't used Marathi font much. Hindi aslyane shuddha type karta ale nahi. Sorry!

      Delete
  3. पाय बुडवून, भाकर्‍या खेळून याचा अर्थ पाण्यात पाय बुडवल्यानंतर पाण्यात तयार होणारे गोल-गोल आकृत्या 🙏

    ReplyDelete